वाट पहाणे सुचले नाही
नवी शोधणे सुचले नाही
आपुलकीचे गाव लागले
घर बांधणे सुचले नाही
माणसांनी ही नाव टाकले
विसरुन जाणे सुचले नाही.
मार्ग बदलले आप्तांनी इथे
सत्व सोडणे सुचले नाही.
सोडून देवून माझे मी पण
तुझे होणे सुचले नाही.
सुचवत गेला खाणाखुणांनी
समजून घेणे सुचले नाही.
उशीरा सुचले हे शहाणपण
वेळेवरती हे सुचले नाही.
२८/०२/२०२२
Comments
Post a Comment