कोठे शोधवे शब्द
ज्यांंनी माणसे जोडली जातात,
नात्यांच्या पानावर दवबिंदू
होऊन सजतात.
कोठे शोधावे शब्द
जे विद्या घेवून येतात,
अभंगांच्या गाथेमध्ये
श्रद्धा होवून राहतात.
कोठे शोधावे शब्द
जे प्रेम घेवून येतात,
मधुसूदनाच्या बासरीमधून
सूर होवून उमटतात.
कोठे शोधावे शब्द
जे ज्ञान घेवून येतात,
जीवनाच्या वाटेवरती
गीता होऊन प्रगटतात.
कोठे शोधवे शब्द
जे माया घेवून येतात,
कृतज्ञतेच्या भावनेला
लोकांपुढे मांडतात.
कोठे शोधावे शब्द
भावनांना अर्थ देतात,
दोन अनोळखी माणसांना
सेतू बनून जोडतात.
१४/०३/२०२२
Comments
Post a Comment