जगातले पहिले शब्द
आईच्या हुकांरात उठले,
तिच्या लेकरांनी ते
आपल्या स्पंदनात ठेवले.
जगामध्ये पहिले काव्य
आईच्या डोळ्यात उमटले,
तिच्या लेकरांनी ते
शब्दा शब्दात ओवले.
जगातले पहिले सूर
आईच्या ओठातून आले,
तिच्या लेकरांनी ते
आपल्या कानात जपले.
जगातले पहिले गीत
आईच्या हृदयात प्रगटले,
तिच्या लेकरांनी ते
इवल्या पापणीत सजवले.
६/०३/२०२२
Comments
Post a Comment