प्रेमच होते ते
ओठांमधून मांडलेले,
डोळ्यांमध्ये भरताना
गळ्यामध्ये गुंतलेले.
प्रेमच होते ते
स्वप्नांमध्ये असलेले
सत्यापासून दूर जात
अपेक्षांमध्ये रुतलेले.
प्रेमच होते ते
सोबतीमध्ये बसलेले,
सुटलेला हातासोबत
दूर जाऊन बसलेले.
प्रेमच होते ते
आपलं तुपलं करणारे,
एकमेकांच्या ओढीने
गालावरती खुलणारे.
प्रेमच होते ते
मुकपणे बघणारे,
दूर राहून क्षणाक्षणाला
काळजामधून तुटणारे.
प्रेमच होते ते
पावसासारखे बरसणारे,
वेळ संपली की अलगद
काढता पाय घेणारे.
२५/०३/२०२२
Comments
Post a Comment