रोज सकाळ होते
रात्रही रोज सरते,
माणसाचे मन का
नैराश्याने भरुन राहते.
प्रकाश रोज होतो
रोजच माघारी फिरतो,
माणसाच्या मनात का
काळोख भरुन राहतो.
पक्षी रोज येतात
घरट्याकडे परत फिरतात,
माणस अशी का
रस्ता विसरुन हरवतात.
पाऊस नेमाने येतो
ऋतू नेहमीच बदलतो
माणूस असा का
एकाच जागी अडकून बसतो.
२६/०३/२०२२
Comments
Post a Comment