कालच्या आठवणींना फुले वाहू कशाला
त्या सुगंधाला नवी साक्ष काढू कशाला.
मार्ग दाखवला त्या चेहऱ्यावरच्या चांदण्याने
उजेडासाठी आता पौर्णिमेची वाट पाहू कशाला.
चाललो आजवर मी निःशंक पाठीमागे
आता नव्याने त्यावर उगाच शंका घेवू कशाला.
नव्हते मागितले कोणाकडे काही कधी मी
आता शेवटच्या क्षणी मी भिक मागू कशाला.
स्पर्धा नव्हती कधी मानली जगणे ही
आता उर फुटे पर्यंत सुखापाठी धावू कशाला.
अस्तित्वाची लढाई असतेच प्रत्येकाच्या नशीबा
आशीर्वादाचे हात पाठी असता मी घाबरु कशाला.
१५/०३/२०२२
Comments
Post a Comment