प्रेम करायचे राहून गेले
मनात खुप स्वप्न होती
रंग भरायचे राहून गेले.
प्रेम करायचे राहून गेले.
खुप शब्द ओठांवरती.
काव्य करायचे राहून गेले.
प्रेम करायचे राहून गेले.
कोणी हसले गालामध्ये
थोडे हसायचे राहून गेले,
प्रेम करायचे राहून गेले.
जिवन होते नजरे समोर
तरी जगायचे राहून गेले,
प्रेम करायचे राहून गेले.
आपुलकीमध्ये पुर्ण भिजलो
त्यांना जपायचे राहून गेले,
प्रेम करायचे राहून गेले.
८/०३/२०२२
Comments
Post a Comment