मने,
सगळीच बोलतात "दुरुन डोंगर साजरे" दुरुन डोंगर कितीही रेखीव दिसत असले तरी ते दिसतात एकसुरीच, हिमालयाच्या शिखरांसारखी काही शिखरेच दुरुनही सुंदर दिसतात,त्यांच्यापासून दुर राहूनच त्यांचे सौंदर्य,भव्यता आदरानी अनुभवावी,नाहीतर बाकीच्या डोंगराजवळ जायला हवे, तरच त्यांच्या अंगाखांद्यावर खेळणारे निर्झर आणी त्यांनी ल्यालेली विविध रंगी वसने अनुभवायला मिळणारच नाहीत.
माणसांच पण असंच असतं काही माणसंच असतात दिपस्तंभासारखी,त्यांच्या नुसत्या असण्यावरुन आपला मार्ग ठरवावा अशी.
बाकीची माणसं मात्र जवळ जावून अनुभवावी.किती विविध रंग असतात स्वभावात लपलेली,खेळावी कधीतरी रंगपंचमी या रंगांचीही,निर्माण होईलही एक नवीनच लोभसवाणी शेड तयार.
निसर्गाकडे जाण्याच्या नादात माणूस हा पण निसर्गाचा अविभाज्य घटक आहे हेच आपण विसरुन जातो मने, जवळ असणा-या माणसांना विसरून जावून दुस-या माणसांना निरखून बघण्यात एवढे गर्क असतो की आपल्या लक्षातच येत नाही,आपल्याला बरोबर मार्ग दाखवणारे दिपस्तंभ कुठे दुर नसतात,आपल्या आसपासच असतात.
(फेसबुक पोस्ट -११-६-२०१७)
Comments
Post a Comment