Skip to main content

लिटील चॅम्प- छोटीसी बात

बघितलत का काकू, कालची ती चिमूरडी मुलं आज परिक्षकाच्या खुर्चीवल बसलीयत, काहीच कसे वाटत नाही त्यांना ?
    अग, अभयंकरणी तुम्हीच न त्यांच्यातली प्रतिभा बघून त्यांना भरभरुन एसएमएस केलेलेत.
       अहो काकू, प्रतिभा वेगळी, आयुष्यभर शिकावं लागते तेव्हा कणभर विद्या मिळते हो.
         त्या छोट्या मुलांना त्यांची प्रतिभा, त्यांची शिकण्यातली जिद्द आणि प्रतिभा बघून निवडायचे असते हो. पण आता तुम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास वाटत नाही कारण त्यांना मत देताना तुम्ही त्यांची जात, त्यांचे गाव, वेळ पडली तर त्यांचे लहान वय बघून निवडून देता.
          ते सारेगम चालू होतं तेव्हा मी गेलेला भाच्याकडे गावाला, आपल्या गावातील मुलगी म्हणून त्या गरीब शेतकरी लोकांनी वर्गणी जमवून मेसेज करताना मी बघितलेय.
          दंडवते काकू, सगळीच काही अशी नसतात हो, काही थोडीजणं तरी गाणं ऐकून मतदान करतात. पण काकू बघा की, त्यांच्या कॉमेंट्समधून अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, महेश काळे यांची झलक स्पष्ट दिसतेय.
           अभयंकरणी, तुला हवयं तरी काय नक्की, ती स्पर्धाच नक्कलची असते, ओरीजनल काय असते त्यात, सर्वात उत्तम नक्कल कोण करतयं याचीच स्पर्धा असते हो ती. उलट एवढ्या प्रसिद्धीनंतरही नवीन काम स्विकारलयं तर मोठ्यांचे अनुकरण करण्याची,शिकण्याची तयारी दिसतेय यातून,अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे वाटतेय का हे.
           अहो काकू पण या मुलांनी नकार द्यायला हवा होता.
            त्यांंनी नकार दिला असता तर दुसऱ्या कोणी ते केलेच असते आणि त्यांनापण नावं ठेवलीच असती की तुम्ही.
             आज गल्लोगल्ली गाणारे झालेयत आणि घरोघरी परिक्षक जन्माला आलेयत.
               लोकं आज मोठ्यामोठ्या लोकांची उदाहरणं देतायत अभयंकरणी, त्यांच्या नम्रपणाबद्दल उदाहरण देताना त्यांचा नम्रपणा आपल्यात नाही, त्यांची आयुष्यभर शिकत राहण्याची असोशी आपल्यात नाही हे यांच्याही लक्षात येत नाही की.
                 तुमचे आपले जगावेगळेच असते दंडवतेकाकू.


Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४