एक क्षण असतो मुक्त बोलण्याचा
एक क्षण असतो मौन पाळण्याचा ,
नको टाळू तू मौनातले इशारे
एक क्षण असतो जीव लावण्याचा.
एक क्षण असतो शब्द वाढण्याचा
एक क्षण असतो शब्द तुटण्याचा,
नको घोळवू तू मनात तेच सारे
एक क्षण असतो आपुलकी जपण्याचा.
एक क्षण असतो तुटून पडण्याचा
एक क्षण असतो स्वत: सावरण्याचा,
नको हात खेचू तुझा तू रे मागे
एक क्षण असतो उभे राहण्याचा.
एक क्षण असतो दु:खी बनण्याचा
एक क्षण असतो सुखाचाबिखाचा,
नको स्वार होवू दु:खाच्या लाटेवर
एक क्षण असतो आनंद लुटण्याचा.
एक क्षण असतो निघून जावयाचा
एक क्षण असतो पाय रोवण्याचा,
नको रे मना निसरड्यावरी धावू
एक क्षण असतो सुख भोगण्याचा
Comments
Post a Comment