मने,
झाले के तुमचे वृक्षारोपण करुन, यंदा ऑक्सिजनचे महत्व प्रकर्षाने लक्षात आले त्यामुळे वृक्षारोपणाचे कार्यक्रम यंदा जरा जास्तच चढाओढीने राबवले जातातायत. जून-जुलैमध्ये अतीपावसाच्या दिवसात लावलेली रोपं किती तग धरतात हा एक संशोधनाचा विषय आहे.
मने, फक्त वृक्षारोपण केलं की आपण ऑक्सिजनच्यासाठी काही करण्याची गरज नाही हा विचारमात्र पुर्णपणे चुकीचा आहे.
पृथ्वीवरचा पन्नास टक्के ऑक्सिजन तर समुद्रापासून मिळतो, समुद्रातील एकपेशीय वनस्पती हा ऑक्सिजन आपल्याला पुरवतात. या वनस्पतींचा सर्वांत मोठा शत्रू आपणच नकळत त्यांच्यापर्यंत पोचवत असते.
जवळपास ६० हजार वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स समुद्राच्या पाण्यात सोडली जातात, आपण कचरा म्हणून टाकलेला एक वर्तमानपत्राचा कागद, एक निरुपयोगी ठरलेली औषधाची गोळी, सिंन्थेटिक कापडाचा एक तुकडा, एक प्लॅस्टिकची पिशवी हे सर्व केमिकल नदीमार्फत, गटारामार्फत समुद्रापर्यंत पोचवले जाते. त्या प्रदुषणामुळे समुद्रातील या वनस्पती संकटात सापडतायत पण हे सर्व समुद्र आपल्याला साभार परत करत असतो.त्यामुळे या सर्वाचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतोच.
मने, वनसंवर्धनाबरोबरच ही केमिकल्स कमीतकमी प्रमाणात आपल्यामुळे निसर्गात टाकली जातील हे बघितले पाहीजे. घरातील कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन हे आर्थिक व्यवस्थापना एवढेच महत्वाचे आहे हे जाणले तरच पुढच्या पिढीला समृद्ध जीवन मिळू शकेल हे आपण लक्षात घेतले पाहीजे.
Comments
Post a Comment