वेगवेगळी फुले उमलली
तीच्या गोऱ्या गालावरी,
दरवळतो सुगंध तीच्या
मलमली कुंतलावरी.
शोधतो नभांतरी मी
आठवणींची पाखरे,
उमलते हृदय माझे
मुग्ध त्या चाफ्यापरी.
शोधतो मी अंतरी
पुन्हा पुन्हा ती छबी,
सुटून जाते वीण
नात्याची हातातूनी.
ईश्वरा तू स्मृती अशी
पुन्हा कुणा देवू नको,
आपुलकीच्या सुगंधाला
कुपीमध्ये कोंडू नको.
Comments
Post a Comment