तू तू - मी मी खुप झाले.
आता....
तिच्याबद्दल बोलू काही.
---------------------------------
ती गाण्यात होती
ती गळ्यात होती
हृदयाला छेडणा-या
तारेतही तीच होती.
ती शब्दात होती
ती कडव्यात होती
शब्दाशब्दात लपलेल्या
भावातही तीच होती.
ती फुलात होती
आसमंतात होती,
फुलाफुलात गोठलेल्या
गंधकोषात तीच होती.
ती ओठात होती
ती मनात होती
आठवणीत साठलेल्या
कणाकणात तीच होती.
Comments
Post a Comment