कधी वाटते तुझेच व्हावे
तुझ्या अंतरी स्वत: वसावे,
तुझे ओठ,तुझाच श्वास
गीत होवूनी जगात यावे.
तुझीच आठवण बनून जावे
तुझ्याच आठवणीत सदा रमावे,
तुझ्याच साठी,तुझ्याच करता
जीवन लेवून पुन्हा जगावे.
तुझे चांदणे सदा उशाला
तुझा सुगंध असो श्वासाला,
तुझ्यासाठी, तुझ्या मिठीत
भ्रमर होवून बंदी व्हावे.
Comments
Post a Comment