निरर्थकाची डायरी--
पुर्वी सापाचा धक्का लागून तो मागून येतो अशी समजूत मनात पक्की होती, तेव्हा माहीतीतला एक माणूस असा धक्का लागल्याचा संशय आला तर स्वत:च्या घरी न जाता शेजाऱ्यांकडे जावून गप्पा मारत बसे, म्हणजे साप पाठून आलाच तर या शेजाऱ्यांच्या घरी यावा.
ही वृत्ती आजही दिसते. मला आठवतयं भावाने एप्रिलमध्ये लस घेतली, लसीकरण आणि करोना टेस्ट शेजारीशेजारी होत होती, एक पॉझिटिव्ह म्हातारबुवा मुद्दाम लशीसाठी आलेल्या लोकांत फिरत होता,त्यांच्या तोंडावरुन हात फिरवत होता.
कोरोनाचा संशय आलेली काहीजणं मुद्दाम दुसऱ्यांच्या तोंडाजवळ तोंड नेवून बोलताना दिसतात ती हीच वृत्ती.
आपण या वृत्तीला टाळू शकत नाही,तोडून टाकू शकत नाही तेव्हा आपल्या हातात एकच असते या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, फिजिकली आणि मेंटली सुद्धा, नाहीतर वृत्तीची आणि विषाणूंची लागण झालीच म्हणून समजा.
Comments
Post a Comment