#अलक
सकाळी उठल्यावर त्याने मोबाईल उघडला, आज जागतिक पर्यावरण दिन.
त्याला लहानपणी खेळायचा तो उंबराचा पार आठवला,ती चिंच तीच्या गाभुळलेल्या चिंचा मुद्दाम मैत्रीणींसाठी शाळेत घेवून जायचा.
ते नीर फणसाचे अवाढव्य झाड, त्याच्या फांदीला बांधलेल्या झोपाळ्यावरचा सवंगड्यांचा धुडगूस.
तो रायवळ आंब्यावर दगड मारुन कैऱ्या पाडण्याचा खेळ.
पातेरं पडतं म्हणून तोडून टाकलेलं एक-एक झाड आठवलं.
खिशात पाकीट टाकून, गाडी घेवून नर्सरीत पोचला. गुलमोहर,सोनमोहर,,रेन ट्री, बदामाची झाडं आणून कंपाऊंडच्या बाहेर रस्त्याच्याकडेला लावून टाकली.
ती झाडं आता याचा मनाच्या सलावर मलम बनून पातेरं सांडत राहतील, पर्यावरण दिनाच्या फोटोत मिरवण्यासाठी
Comments
Post a Comment