Skip to main content

निसर्गायण

परवा काका म्हणाले " चालत रहा, चालत रहा, चालणाऱ्याला निसर्ग भेटतो, एकदा स्वत:ला अवकाशात बंदिस्त करुन टाकले की निसर्गसुक्त घरातच आळवत बसावे लागते.
           स्वामींच्या भाषेत बोलायचे तर " एकदा बंदिस्त अवकाश स्विकारला की त्याला तुरुंग समजायचे की मानसिक उब देणारे देवालय हे आपल्या हातात असते."
             अवकाश तरी कुठे निसर्गापासून वेगळा असतो, तो ही निसर्गाचाच एक अंश. तिथेही सुर्य असतोच,कधी दाहक तरी कधी उबदार, हवाहवासा वाटणारा, आत कुठला ऋतू जपायचा हे आपल्याच हातात असते.
               तिथेही चंद्र असतो पौर्णिमेचा,शितल चांदणे देणारा.
                तिथेही हवाहवासा वाटतो हिवाळ्यातला गारवा,सफरचंद पिकवणारा.
               तिथेही इंद्रधनुष्य उमलून जाते, भरलेला मेघांच्या वर्षावा पाठोपाठ.
               तिथेही असते वृक्षांची सावली, वेलींची प्रफुल्लता, फुलांचा सुगंध आणि कोवळ्या पालवीची कोमलता.
               तिथेही असते मातीची सगुणता आणि पाण्याची झुळूझुळू वाहणारी निर्मलता.
              फक्त तृप्त व्हायचे याच्या सानिध्यात, जवळचे सोडून बाहेरच्या निसर्गासाठी का कुठत बसायचे.
               निसर्ग इथेही असतो आणि तिथेही, आपणही निसर्गाचाच एक घटक आहोत,अभिन्न घटक निसर्गाचे. निसर्गाचा अंशावतार.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४