बंद केले सडा सारवण अंगणाला आता
माझे ही मन दु:खाला सरावले आता.
नकोत आता वरवरचे उपचार कोणतेही
तिच्या हसण्याला औषध मानणे सोडले आता.
मी एकटाच लढणार दोघांच्या नशिबाशी
अंधाराचे वरदान ही माझ्याच चंद्राने दिले आता.
माहीती आहे ती होती भेट शेवटची आपली
मी माझा पत्ता आयुष्यालाही देणे सोडले आता.
होता हातात हात जेव्हा डोळे फितूर झाले
सांगण्यासाठी शब्द उसने घ्यावे लागले आता.
०१/०२/२०२२
Comments
Post a Comment