तुझ्याचसाठी पसरली क्षितीजावरती लाली,
तुझ्याचसाठी पांघरली निसर्गाने नव्हाळी.
तुझ्याचसाठी आभाळी होते मेघांची दाटी,
तुझ्याचसाठी धरणीमधुनी तृण जन्म घेती.
तुझ्याचसाठी पहाटवेळी पक्षी गाणी गाती
तुझ्याचसाठी झाडांवरती फुले फुलून येती.
तुझ्याचसाठी सुगंधाची वाऱ्याला मिठी,
तुझ्याचसाठी निसर्गातून ऋतू अवतरती.
Comments
Post a Comment