मलाही कधीतरी तरुन जायचा होता,
नव-काव्याचा अथांग, दुर्बोध, जीवघेणा सागर.
छंद, वृत्त, यमक या जिवनरक्षक साधनांच्या सहाय्याशिवाय,
फक्त विरामचिन्हांची वल्ही वापरुन.
गद्याच्या धुक्यात दडलेल्या भावनांना
शोधायचे होते नवकवितेच्या रुपात.
मलाही मिरवायचे होते
नवकवीचे बिरुद लावून
साहित्य शारदेच्या दरबारात
एक यशस्वी मानकरी म्हणून.
२५/०२/२०२२
Comments
Post a Comment