माझ्या कवित्वाचा अंश
माझ्या वेदने मागचा दंश
माझ्या शब्दांचा सारांश
तुझ्यापायी.
माझ्या आनंदाचे निधान
माझ्या स्वप्नांचे विधान
माझ्या समृद्धीचे गान
तुझ्यापायी.
माझ्या कल्पनेचा खेळ
माझ्या अनुभवाचा मेळ
भावनांचा कल्लोळ
तुझ्यापायी.
माझ्या कवितेतला भाव
माझ्या शब्दांतील ठेव
माझ्या कल्पनेतला जीव
तुझ्यापायी.
माझ्या कवित्वाची धनी
माझ्या हातातील झरणी
स्फुरते माझ्या मनी
तुझ्यापायी.
२६/०२/२०२२
Comments
Post a Comment