वाऱ्याच्या झुळके सम येवून गेली ती
रातराणीचा सुगंध मनात सोडून गेली ती.
धुंद पावसाच्या खुणा इथे मांडून गेली ती
अस्तित्वाच्या खुणा इथे उमटवून गेली ती.
नव्हता केला पुन्हा भेटीचा वायदा कोणी
तरी न पुसणारी अक्षरे कोरुन गेली ती.
नव्हता फुलांचा बहर उमललेला जरी इथे
अत्तरा सारखी सुगंधी दरवळून गेली ती .
कळी सारखी उमलली, आणी फुलून गेली
फुला सारखी वाऱ्यावर डोलून गेली ती.
जे कधीच रुजून येणार नाही असे निसत्व
असे कोरडे शुष्क बी मनात पेरुन गेली ती
ऋतू सारखे उधळले सभोवताली रंग
ऋतू सारखीच चार दिवस राहून गेली ती.
१७/०२/२०२२
Comments
Post a Comment