एखादे गाणे असे गावे
नभामध्ये भरुन रहावे,
एकदा प्रेम असे करावे
जिवन सारे सार्थ व्हावे.
एकदा तरी असे बोलावे
शब्द सारे सरुन जावे,
एखादे वाक्य असे मांडावे
कायमची ओळख बनावे.
एखादे काव्य असे स्फुरावे
अर्थपूर्ण गीत व्हावे,
एखादी तान अशी घ्यावी
ऐकणाऱ्याने तृप्त व्हावे.
एकदा तरी असे वागावे
समोरच्याने सुखी व्हावे
एकदातरी असे जगावे
कायमची स्मरणात उरावे.
Comments
Post a Comment