अजूनही या घरट्यात अभंग आहेत प्रीतीचे घडे
अजूनही अंगणात पडतात प्राजक्ताचे सडे.
अजूनही ऋतू वसंत उमलतो माझ्या दारी
अजूनही तुझ्याचसाठी चातक घेतसे भरारी.
अजूनही रोज रात्री चांदण्याची पायवाट
अजूनही उजळते आठवणीतील तुझी बट.
अजूनही श्रावणात भरुन येती मधुघट
अजूनही तुझ्याच साठी जागी राहते पहाट.
अजूनही तृणांकरांना सय तुझ्या स्पर्शाची
अजूनही आठवण ओली सोबतच्या वर्षाची.
Comments
Post a Comment