कुठे काही बोलावे असे ठिकाण राहीले नाही
कुठे जरा थांबावे असे मकाण राहीले नाही.
आयुष्य हा अड्डा झाला राजकारणाचा
माणसाला किंमत असेल दुकान राहीले नाही.
सांगोवांगीच्या गोष्टींनी भरुन गेला ग्रंथ आपला
सत्य परिस्थिती ऐकणारे कान राहीले नाही.
भरुन गेली कोठारे द्वेषाच्या लागवडीने
कोणी आता पुर्वीसारखे सुजाण राहीले नाही.
सापडले आहे जहाज भयंकराच्या वादळात
योग्य मार्गावर ठेवणारे सुकाण राहीले नाही.
आदर्शाची उडवणे खिल्ली नेहमीचेच झाले.
सर्वांनाच प्रेरणादायी असा प्रमाण राहीले नाही.
प्रत्येकाला हवी असते शांतीब्रह्माची ठेव
नम्रपणे स्तब्ध व्हावे असे प्रतिष्ठान राहीले नाही.
Comments
Post a Comment