पुन्हा पुन्हा जोडत राहतो
नशीबाला दोन हात
एवढी कसली ओढ
आयुष्याची.
पुन्हा पुन्हा कशी पाहतो
नवी स्वप्न डोळी
उठून परत सकाळी
कासाविशी.
पुन्हा पुन्हा ओढून नेते
अव्यक्ताची शिदोरी
एवढी कसली भुक
सोबतीची.
पुन्हा पुन्हा वाटत राहते
होईल सारे ठिक
एवढा कसा विश्वास
नशीबावर.
Comments
Post a Comment