दिवसरात्रीचे रहाटगाडगे
कोण फिरत ठेवते,
आपल्यासाठी जीवनसरिता
कोण घेवून येते.
सुखदु:खाचे गीत त्यातून
अविरत उमटत राहाते,
आयुष्याच्या क्षितीजावरती
कोण पहाट करते.
तृषार्ताच्या ओंजळीमध्ये
कोण अमृत देते,
तृप्त करुन आयुष्याला
कोण सार्थकता देते.
असते थोडे,नसते थोडे
भाव भक्तीचे देणे,
त्याच्या मुरलीमधूनी
जिवन गाणे स्फुरते.
Comments
Post a Comment