फार काही मागत नाही
कधीतरी बोलत जा,
आनंद ठेव मनामध्ये
दु:ख तरी सांगत जा.
फार काही मागत नाही
कधीतरी दिसत जा,
नेहमी आली नाहीस तरी
दिलखुलास हसत जा.
फार काही मागत नाही
कधीतरी स्मरत जा,
तुटून गेले सर्व तरी
आठवणी जपत जा.
फार काही मागत नाही
स्वत:ला जपत जा,
माझ्यासाठी नाही तरी
स्वत:साठी देवाकडे मागत जा.
फार काही मागत नाही
आठवणीत येत रहा,
विसरलीस मला तरी
माझ्या मनाला उजळत जा.
२४/०२/२०२२
Comments
Post a Comment