पाऊसधारेत भिजायचे राहून गेले
रे आयुष्या, प्रेम करायचे राहून गेले.
रंगांनी भरला होतो मळवट फुलांचा
रे आयुष्या, रंगात रंगून जायचे राहून गेले.
सुगंधाने कोरले होते लेणे हवेमध्ये
रे आयुष्या, स्वत: सुगंधी व्हायचे राहून गेले.
आई नावाचे बिरुद मिरवले वेळोवेळी
रे आयुष्या, कसे ते माऊली बनायचे राहून गेले.
मी पण माझे सदा मिरवले पावलोपावली
रे आयुष्या, दुसऱ्यांचा विचार करणे राहून गेले.
२५/०२/२०२२
Comments
Post a Comment