वाचत नाही असे नाही
ऐकत नाही असे नाही
का जाणे आजकाल
शब्द मनात ठसत नाही.
भेटत नाही असे नाही
बोलत नाही असे नाही,
का जाणे आजकाल
नातं पुर्वीसारखे टिकत नाही.
चालत नाही असे नाही
रमत नाही असे नाही
का जाणे आजकाल
निसर्ग मनात फुलत नाही.
जोडत नाही असे नाही
जपत नाही असे नाही,
का जाणे आजकाल
नाळ कोणाशी जुळत नाही.
समजत नाही असे नाही
उमजत नाही असे नाही,
का जाणे आजकाल
जास्त कोणाशी पटत नाही.
पुजत नाही असे नाही
भजत नाही असे नाही,
का जाणे आजूनही
माझे मी पण सरत नाही.
०४/०४/२०२२
Comments
Post a Comment