माथी हजार ओझी घेवून चालतो मी
मुखी हजार बंध असून बोलतो मी.
वेचली अमाप नाती कोवळ्या विणीची
मनी सुगंधी कोडी जपून चालतो मी.
आभाळी अजोड नक्षी,दाटलेल्या मेघमाळी
उमलून पुन्ही देही अजून नाचतो मी.
थोपवून चांदणे काठावर पापण्यांच्या
आठवण रेशमाची ठेवून जागतो मी.
-------अभय बापट
२६/०४/२०२२
Comments
Post a Comment