वैश्विक सत्य----
१) निगेटिव्ह पब्लिसिटी ही व्यवसायवृद्धीसाठी वापरली जाते मग तो व्यवसाय राजकारणाचा असो, समाजकारणाचा असो किंवा संस्कृतीचा असो.
२) निगेटिव्ह पब्लिसिटीसाठी भाड्याने माणसे मिळतात, भाड्या हा एक व्यवसायीक घटक असून सत्य अधोरेखित करणाऱ्या रंगीत पेन्सिल एवढेच त्याचे महत्व असते, त्याने सत्यावर काहीही परीणाम होत नाही, योग्य किंमत दिली की बाजारात उपलब्ध होतात.
३) संस्कृतीपेक्षा अर्थकारण जास्त अर्थपुर्ण असते.
आपल्या ग्रंथांमध्ये आंब्याच्या झाडांचा उल्लेख आहे,हापूस आंब्यांचा नाही.
नाही म्हणायला ऐतिहासिक साहित्य इवल्याश्या लिंबाचे रुपांतर रसदार सोनसळी हापूस मध्ये होते असे उल्लेख सापडतात. जिज्ञासूंनी आचार्य काकोडकर यांचे ग्रंथ अभ्यासावेत. किंवा हैदोस, बिनधास्त कथा या तत्कालीन साहित्याचा अभ्यास करावा. "आनंदध्वजाच्या कथा" किंवा "कथा कालचा-आजच्या आणि उद्याच्या" या रसग्रहणात्मक ग्रंथांचा उच्च अभ्यास करावा, थोडासा आनंद साधला तर साधू शकेल.
४) ट्रोलिंग हे दुधारी तलवारीसारखे असते ते कधीतरी तुमच्यावरच उलटणार असते, "हर कुत्ते के दिन होते है" वाक्य कायम स्मरणात ठेवावे लागते.
०८/०४/२०२२
Comments
Post a Comment