आयुष्य ओझे वाटत आहे , थांब मित्रा
सौख्य तुझ्याशी भांडत आहे, थांब मित्रा.
नको उधळूस क्षण सुखाचे वाऱ्यावरती
बाहेर वादळवारा वाढत आहे, थांब मित्रा.
क्षणाक्षणाला येत असतात अन्यायाचे लोंढे
सुख हातातून सुटत आहे, थांब मित्रा.
नको मांडू वैर असे प्रत्येकाशी
माणसातूनच देव घडत आहे, थांब मित्रा.
असेल विश्वास मनगटावर जर तुझा
घामातून जीवन फुलत आहे थांब मित्रा.
असेल कोणी पाठी लढ म्हणून सांगणारे
धिरापोटीच जग चालत आहे,थांब मित्रा.
असेल अभयहस्त पाठीवरती सद्गुरुंचा
आशेवरती जग जगत आहे, थांब मित्रा.
----अभय बापट
२६/०४/२०२२
Comments
Post a Comment