मला पुस्तकं वाचायला आवडतात.....
ती स्वत:च एक पुस्तक आहे....
मला अर्थ समजून घ्यायला आवडतो....
ती स्वत:च शब्दामागे दडलेला अर्थ आहे...
मला शब्दांमध्ये न सामावलेले गुज जाणायला आवडते....
ती स्वत:च मौन आहे,शब्दांना अर्थाचे कोंदण देणारे...
मला मुक राहून पुस्तक समजून घ्यायला आवडतात...
ती स्वत:च माझ्या मुकपणाला अर्थ देणारं महाकाव्य आहे.
मला ती आवडते...
तिने दिलेल्या अर्थामुळे परिपूर्ण झालेला मी तिला आवडतो.
पुस्तकं अशीच असतात, सर्वांना सामावून घेणारी
आणि न उलगडलेल्या प्रश्नांची कोडी सोडवत प्रत्येक क्षणाला अर्थ देणारी.
-----अभय बापट
२३/०४/२०२२
Comments
Post a Comment