कोणी हसवून गेला
कोणी फसवून गेला,
शाळेमध्ये अनुभवाच्या
कोणी बसवून गेला.
रीत जगाची जगावेगळी
कोणी दाखवून गेला,
मर्म स्वभावाचे वेगवेगळे
कोणी समजावून गेला.
किती स्पर्धा जगात आहे
कोणी सावरुन गेला,
स्पर्धेच्या युगात तुम्हाला
कोणी हरवून गेला.
तुमच्यासाठी होते नाते अमूल्य
कोणी तोडून गेला,
जपलेले धागे तोडताना
कोणी दुखावून गेला.
ऊन पावसाचा खेळ
कोणी वापरुन गेला.
साळसूदपणे येवून
कोणी विसरुन गेला.
१७/०४/२०२२
Comments
Post a Comment