अश्रूंचे हिशेब कोणाला द्यायचे नाही
सुख कोणाच्या अधीन करायचे नाही.
रोजच जपतो श्वासांना ज्या जगण्यासाठी
जीवन कोणाकडे गहाण ठेवायचे नाही.
स्वत:च्या सुखासाठी हजार इमले रचतो
पाया रचण्यासाठी कोणापुढे झुकायचे नाही.
अश्रूंची वाहीली जरी डोळ्यांतून नदी
कोणाच्या अश्रूंमुळे यापुढे द्रवायचे नाही.
मी सुखात आहे हे कोणाला सांगायचे नाही
आपल्या सुखाशी यापुढे कधी भांडायचे नाही.
--अभय बापट
२४/०४/२०२२
Comments
Post a Comment