दुमडलेले कोपरे...
भरल्या असत्य गोष्टी सदा मनात आमच्या
ते खुशाल येवून आज कान पिरगळू लागले.
कोपरे पुस्तकाचे अश्रू ढाळीत बसले
शब्दवेल्हाळ पान मनात दरवळू लागले.
नको काढूस खोडी त्या उसन्या पुस्तकांची
अपमान पुस्तकांचे मला छळू लागले.
आहे तमा कुणाला त्या ज्ञान संचिताची
तुमच्या खेळात बिचारे पान गळू लागले.
मग आठवणींनी त्यांच्या माजले मनात रान
दुर्मिळ म्हणून ते जगात दरवळू लागले.
अभय बापट
२५/०४/२०२२
Comments
Post a Comment