कल्पनेचे पंख मला
कधीतरी देशील का ?,
शब्द होवून माझ्या हाती
शब्द सुमने देशील का ?.
प्रतिभे तू माझ्या माथी
कृपा छत्र धरशील का?,
कधीतरी माझ्या हाती
सृजनाचे देणे देशील का ?
कल्पनेच्या तीरावरुन
कृष्ण मुरली घूमेल का ?
आणि माझ्या शब्दा़मधून
राधा मुर्त सजेल का ?
अलौकिकाचा दिव्य स्पर्श
उराउरी भेटल का ?
आणि आयुष्याच्या संचिताला
एक कविता स्फुरेल का ?
१२/०४/२०२२
Comments
Post a Comment