नको त्या रस्त्यावरुन साद आली
नको त्या वळणावर भेट झाली.
गेलीस तू पांघरुन चांदणे सारे
उजेडाची जेव्हा मला सवय झाली.
किती वेचू फुले अंगणातली माझ्या
जिथून तू काल पदर झटकून गेली.
उंबरा अजूनही सुगंधी आहे मनाचा
ज्यातून तुझ्या पावलांची चाल झाली.
येते अजूनही पहाटे जाग पाखरांना
त्यांनाही तुझ्या गाण्याची सवय झाली.
घेवून फिरतो सुखाची उब मनात माझ्या
जेव्हा तू समाधानाशी भेट करुन दिली.
१०/०४/२०२२
Comments
Post a Comment