कुठून उपजते वैर आत, सांग देवा
कुठून उगवतो द्वेष मनात,सांग देवा.
चातकाने झेलले जिथे मोती मुखात
कोण पेरते विष अंतरात, सांग देवा.
चांदण्या रात्रीत ग्रहण कसे लागते
कोण फिरवते दिवस जगात,सांग देवा.
अमृताचे फळे झाडाला आली कधी
कशी शिरली किड फळात, सांग देवा.
प्रयत्नाने भरली होती जत्रा भक्तीची
कसा उसळला उन्माद अंगात,सांग देवा.
शब्दसुमनांची उधळण जिथे केली कधी
कुठून पेटला अंगार शब्दात,सांग देवा.
© अभय बापट
१८/०४/२०२२
Comments
Post a Comment