तुच माझ्या आयुष्याची ती अनोखी बात आहे
तुच माझ्या आयुष्याची नव्याने सुरवात आहे.
डोळ्यांमध्ये डोळे गुंतले, श्वासामध्ये श्वास ग
तुच माझ्या आयुष्याचे ते सुरीले गीत आहे.
तुच आहे आदी आणि अंतामाही तूच आहे
तुच माझ्या आयुष्याचे पर्व जे अज्ञात आहे.
असूनही नजरे समोर मृगजळासम दूरआहे
तुच माझ्या आयुष्याची जगण्याची रीत आहे.
प्रतिभेचा स्पर्श नसूनही पुन्हा पुन्हा बोलतो
तुच माझ्या आयुष्याचा स्पर्श,ज्यामुळे विख्यात आहे.
भावनेची ओळख तू दिली,जी सर्वाहून गोड आहे.
तुच तो आयुष्यातील क्षण,जो प्रेम म्हणून प्रख्यात
आहे.
----अभय बापट
२४/०४/२०२२
Comments
Post a Comment