हे मित्रांनो शब्द व्हा
कुंठल्या गीतास माझ्या
प्रतिभेचे पंख द्या.
हे मित्रांनो शब्द व्हा......
अलौकिकेची साधना जी
शब्दांत मांडली तुम्हा,
प्रतिभेचे दोन थेंब
आज मला प्राशू द्या.
हे मित्रांनो शब्द व्हा....
छंद,वृत्त आणि मात्रा
सदा वसती इथे,
कोंदणात त्यांच्या आज
भावनांना उमटलू द्या.
हे मित्रांनो शब्द व्हा.....
हे शब्दांनो मित्र व्हा
कुंठल्या गीतास माझ्या
प्रतिभेचे पंख द्या...
हे मित्रांनो शब्द व्हा.
-----अभय बापट.
२४/०४/२०२२
टिप----
क्षमस्व, कविवर्य कुसुमाग्रज, हे विडंबन नाही, ही साद आहे शब्दांना आणि मित्रांना अडलेली कविता पुर्ण करण्यासाठी.
Comments
Post a Comment