पिवळा पिवळा साज लेऊन
नववधू सजली,
पर्जन्यराजाच्या आगमनाची
वाट पहात बसली.
ऋतूराजानेही फुलवला
सृष्टीचा मळा,
सुस्वर गाणी उमटती
पक्षांचीया गळा.
माणसांनाही लागली मग
सुखाची चाहूल,
वर्षाराणीच्या मागून पडेल
समृद्धीचे पाऊल.
निसर्गांनेही उमटवल्या
सावधगिरीच्या खुणा,
वसंतामागून ग्रिष्माच्या
दाहक पाऊलखुणा,
उतू नकोस, मातू नकोस
जप देवा घरचे देणे,
एकदा हातून निसटले तर
नशीबी वाट पाहाणे.
-----अभय बापट
२२/०४/२०२२
Comments
Post a Comment