Skip to main content

Posts

Showing posts from 2026

पंखांमधले बळ

नाही मिळत कोठे उसने पंखामधले बळ ठेव पाय भुईवर आणि भर कवेत आभाळ नाही देत कोणा कोणी फुकटची साऊली बांध घरटे उबेत आणि हो जगाची माऊली. नाही देत कोणी फुका ज्ञानाचा प्रकाश हो सावित्रीची लेक आणि धर पुस्तकांचा ध्यास. नाही उगाच दरवळत जीवनाचे चंदन मान ठेव श्रमांचा आणि कर सत्याला वंदन. नाही मिळत सहज कुणाला कीर्तीचे ते धन जप ध्येय मनाशी आणि कर परिश्रम साधन. नाही घालत उगाच गळ्यामध्ये यश किर्तीचा हार ठेव जिद्द मनामध्ये आणि घाल अंधारावर वार. --- अभय बापट ०८/०३/२०२६

अंतर

तू निळ्या नभाचा राजा मी निष्पर्ण धरेची राणी तुझ्या माझ्या सोबतीचा करार लिहिला कोणी. कोणी लिहिली माथी सटवाईची अदृष्य लिपी नकळत जोडून जातात ही जन्मभराची नाती. ही ओढ कुठूनी येते अलवार रंग गंधाची पटवून ओळख देते खूण जन्म जन्माची. पैलतीरावरुन येतो पाव्याचा नाजूक सूर पुन्हा पावले माझी जातात निघून दूर तू कृष्ण होतास तेव्हा मीच होते का रे राधा नावाविना नात्याची का मलाच होते बाधा. -----अभय बापट २९/०३/२०२६

बळ पंखातले

नाही मिळत कोठे उसने पंखामधले बळ ठेव पाय भुईवर आणि भर कवेत आभाळ नाही देत कोणा कोणी फुकटची साऊली बांध घरटे उबेत आणि हो जगाची माऊली. नाही देत कोणी फुका ज्ञानाचा प्रकाश हो सावित्रीची लेक आणि धर पुस्तकांचा ध्यास. नाही उगाच दरवळत जीवनाचे चंदन मान ठेव श्रमांचा आणि कर सत्याला वंदन. नाही मिळत सहज कुणाला कीर्तीचे ते धन जप ध्येय मनाशी आणि कर परिश्रम साधन. नाही घालत उगाच गळ्यामध्ये यश किर्तीचा हार ठेव जिद्द मनामध्ये आणि घाल अंधारावर वार. --- अभय बापट ०८/०३/२०२६

स्त्रीचा सन्मान हाच संस्कृतीचा अभिमान

समजतंय का तुला,            भारतात या हिंदूस्थानात जन्म घेतलास हे तुझे सौभाग्यच. नाही, हे नेहमीसारखे गुळगुळीत वाक्य नाही‌.           जगातील प्रत्येक स्त्रीला स्वत:चा हक्क, मानसन्मान मिळवण्यासाठी लढावे लागले हे खरे पण हिंदूस्थानातील परिस्थिती सगळ्या जगापेक्षा वेगळी होती.            "जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवता वास करतात", या शब्दात स्त्रीयांना सन्मान आपल्या संस्कृतीत दिला गेला.              हिंदूस्थानी संस्कृत ऐहिक सुखासाठी आवश्यूअसलेल्या विद्या,धन आणि शक्ती या तिन्हींची देवता म्हणून सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना मान दिलेला आहे.              नंतर हा मान सन्मान हरवत गेला तरी भारतीय स्त्रीसाठी हे सोनेरी शिखर कायमच मार्गदर्शन करत होते.ध्येय माहिती होते, मार्ग माहीती होता,त्या काट्याकुट्यातून रस्ता काढणे एवढाच संघर्ष भारतीय स्त्रीला करावा लागला, तिथेही त्यांच्यासाठी सुविचारी पुरुषांची साथ मिळत होतीच.       ...

रंग आयुष्यातील

वेदनेचे रंग गहिरे  आयुष्याला घाली कोडे, सुखदुःखाच्या रंगामधले कसे घ्यावे थोडेथोडे. डोळ्यांमध्ये भरुन घ्यावे उषेमधले रंग गुलाबी, एकांतामध्ये हळूच गावे तुझे माझे गीत शराबी. फुलाफुलांचे रंग आगळे नात्यांमध्ये असे भरावे, नावाबद्दल नात्यांच्या मग किंतू सारे तिथे सरावे. फुलपाखरी रंग गोजरी आकाशात भिरकावून द्यावे, आयुष्याला तुझ्या माझ्या  रंगबेरंगी रंग भरावे. आभाळाचा रंग निळा तो हृदयामध्ये असा भरावा तुझे माझे भेदाभेद मग मनामधून पूरा सरावा. वेदनेचे रंग गहिरे  कुपी मध्ये भरुन घ्यावे, यशाच्या भाळी रेखून गर्वापासून दूर सरावे. आठवतले रंग सारे शब्दांमध्ये भरुन घ्यावे, गीत म्हणून त्यांनाच मग आपल्यांसंगे खुषीत गावे. ----अभय बापट. २८/०२/२०२६

शब्द

शब्दांच्या पाठून येते शब्दांचे वास्तव ओझे, शब्दांच्या भावनांचे नकळत पाऊल वाजे. शब्दांनाही येते जाग शब्दांनाही असती भोग, शब्दांनाही सोसावी लागते आपल्या पुर्व कर्माची धग. -----अभय बापट २२/०२/२०२६

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा प्रताप....                शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे.                शिवरायांची सलगी देणे, माणसांशी, परिस्थितीशी,प्रसंगांशी आठवणे, त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करणे हिच महाराजांना खरी आदरांजली. पण आपल्या समाजाचे झालेय काय, आपण आपल्या आदर्शांना, सर्वोत्तम नेतृत्वांना देवत्व बहाल करुन, त्यांच्या गुणांचे, त्यांनी आचरणात आणलेल्या विचारांचे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करण्यातून मुक्त होतो.                मुक्त होतो आर्ततेने साद घालायला, महाराज पुन्हा जन्म घ्या.                 शिवरायांनी बालवयात आपल्या बालसवंगड्यांच्या मनात पराक्रमाची ठिणगी पेटवली, असंख्य ज्ञात अज्ञात मराठी मनाच्या हंकारातून त्याचा वडवानल झाला.                 पण ती एकदा पेटवलेली ठिणगी जपण्यासाठी शिवरायांना कितीजणांना सलगी द्यावी लागली, किती कठिण प्रसंगातून पार पडावे लागले, कि...

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा प्रताप....                शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे.                शिवरायांची सलगी देणे, माणसांशी, परिस्थितीशी,प्रसंगांशी आठवणे, त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करणे हिच महाराजांना खरी आदरांजली. पण आपल्या समाजाचे झालेय काय, आपण आपल्या आदर्शांना, सर्वोत्तम नेतृत्वांना देवत्व बहाल करुन, त्यांच्या गुणांचे, त्यांनी आचरणात आणलेल्या विचारांचे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करण्यातून मुक्त होतो.                मुक्त होतो आर्ततेने साद घालायला, महाराज पुन्हा जन्म घ्या.                 शिवरायांनी बालवयात आपल्या बालसवंगड्यांच्या मनात पराक्रमाची ठिणगी पेटवली, असंख्य ज्ञात अज्ञात मराठी मनाच्या हंकारातून त्याचा वडवानल झाला.                 पण ती एकदा पेटवलेली ठिणगी जपण्यासाठी शिवरायांना कितीजणांना सलगी द्यावी लागली, किती कठिण प्रसंगातून पार पडावे लागले, कि...

आळवावरचे पाणी

घ्यावे हातात वेचून आळवावरचेही पाणी, सावरावे घरटे आपुले सुटत्या निसटत्या क्षणी. क्षणात दिसते देखणे क्षणात दिसेनासे होते, सुख असेच असते दु:खाला घेवून येते. आनंदाचे क्षण क्षण मनापासून जपावे, दु:खाचे दान म्हणजे डाव देवाचा जाणावे. आळवावरच्या पाण्याला क्षणभंगुराचा साज, मनामध्ये जपावी त्याच्या मुळातली गाज. आयुष्यही असेच सारे चंचल क्षणांचे गान, मनामनात जपावे शाश्वत शब्दांचे भान. साधेसुधे शब्द माझे नाही अनुभवाचे दान, अळवावरचे पाणी जणू क्षणात जाती गळून. ----अभय बापट १८/०२/२०२६

चाळीशीची कविता

तुझ्या डाळींबी ओठांवरची पाखरं आली भरात, तुझ्या कोकीळकंठी गळ्यातून शब्द उलगडती सुरात. तुझ्या सोनसळी रंगाचे तेज ऊन्हात नाहते, तुझ्या हिरव्याकंच यौवनाचे पिक डौलत डुलते. तुझ्या काजळी डोळ्यातून माया अपार सांडते, तुझ्या काळ्याकंच केसाची नदी वेगात धावते. तुझ्या गुलाबी गालांचे वैभव मनाला लोभवते, छोट्या खळीच्या वाटीत अमृत भरुन वाहते. तुझे रुप मनोहरी सुगंधाचा ग ठेवा, तुझ्या कस्तुरी गंधाचा वाटे निसर्गाला हेवा. -----अभय बापट १८/०२/२०२६

आनंदाचा डोह

आनंदाचा डोह आपल्या अंतरी, घेवू या भरुन  सुखाच्या घागरी. सुखाच्या घागरी करुया जतन, समाधानाचे गाणं गावूया जमून. गावूया जमून समृद्धीची गाणी, राहूया कृतज्ञ देवाची करणी. देवाची करणी जाणू मनोमनी, ओंजळीनी वाटू आपुलकीची नाणी. मी-तू पणाचा सोडूनीया मोह, नितळ राखूया आनंदाचा डोह. ----अभय बापट १७/०२/२०२६

राधे कृष्ण ---विश्वास

कृष्णा,          कोणतरी आपलं आहे, आपल्यासाठी आहे, नेहमीचा सहवास,संपर्क नसला तरी दुर राहूनही कोणीतरी आपलं आहे ही भावनाच किती गोड आहे.दुधावरच्या सायी सारखी स्निग्ध,मुलायम.           कधीतरी अचानक ही जाणीव तुटते, तोडली जाते,नष्ट होते तेव्हा जाणवणारी वेदना कोणाला सांगावी.            कृष्णा तुलासुद्धा काहीजणांना दूर सारावे लागले,कर्तव्य कर्म म्हणून. तू तर सर्वज्ञ ना रे, तुझ्याही लक्षात आली नाही का ही वेदना ?टाळले जाण्याची, तुटण्याची, एकाकीपणाची, आपलं म्हटलेलं दूर जाण्याची, हातातून हात सुटण्याची?               तुला कोणीच समजू शकले नाही कृष्णा, तुझ्यासारखे अलिप्त कोणीही नाही राहू शकत. तू कधीच कुठे गुंतला नाहीस कृष्णा, ना कुठल्या स्थळी, ना कोणत्या माणसात, ना कोणत्याही प्रसंगात. तू नदीच्या प्रवाहासारखा.                     कृष्णा, तू नदीच्या प्रवाहा सारख कायम पुढे पुढे जाता राहिलास. प्रवाहातील पाणी हे तिथल्या प्राण्यांसाठी जीवन असते, ...

संयम---कृष्ण

संयम, राधे,             संयम,            बोलला जाणारा प्रत्येक शब्द, घडणारी प्रत्येक घटना टिपकागदावरती पसरणाऱ्या शाईसारखी हळूहळू आपल्या मनावर आपला रंग सोडत असते.            विचारपूर्वक बोलावे राधे आणि विवेकाने चालावे यातच स्वतःसह सर्वाचेच हित असते. प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा अवतार घेताना योग्य क्षणाची वाट संयमाने पहावी लागते राधे.              राधे, लोखंडाच्या तुकड्यापासून हत्यार घडवणाऱ्या तो लोहाराचे निरिक्षण कर, संयमाचे अत्युत्तम उदाहरण आहे तो. योग्य तितके लाल होईपर्यंत संयमाने वाट पहात बसावे लागते मग घणाचा एकच घाव, योग्य वेळी,योग्य ठिकाणी, योग्य ताकदीने. तेव्हाच सुबक,धारदार शस्त्र तयार होते.               योग्य क्षणी,योग्य प्रकारे केलेली कृती यश देते राधे, तो क्षण येईपर्यंत वाट पाहणे हाच कर्मयोग.                राधे, संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे,ती वापरला तरच बाकीच्या किल्ल्यांचा उपयोग,...

पत्र....माझे मला

प्रिय,       अभय.               ‌तुला प्रिय म्हणावे का, चालेल का तुला? आपल्याला आवडत्या व्यक्तीचा उल्लेख आपण प्रिय असा करतो, अरे पण तू तर तुझ्या स्वत:वरच नाराज असशील तर प्रिय म्हणावे तरी कसे ?.                आयुष्यात काही निर्णय चुकतात, काहीवेळा अनपेक्षित निर्णय घ्यावी लागतात पण हेच तर जीवन आहे.                 मध्यंतरी तूच तर पुस्तक ,"शल्य अधुऱ्या स्वप्नांचे" आणले होतेस, अनेक यशस्वा माणसांना कोणीतरी वेगळेच व्हायचे होते आणि त्यांचे करियर वेगळेच झाले तरी त्यांनी जीव ओतून कष्ट केले आणि यश खेचून आणलेच. त्यातील अनेकांना तर शुन्यातून सुरवात करावी लागेल.                   तूला नशीबाने उंच उडायला आयते पंख मिळाले, उंचावर पाय रोवायला भक्कम फांदीचा आधारही मिळाले. तु धडपडलास तर आधारला, सावरायला मदत करणारे हातही तुला नशीबाने तुझ्या आजूबाजूला मिळाले आहेत.                  आपल्यातील...

तू म्हणशील तेव्हा

तू म्हणशील तेव्हा देईन साथ हातामध्ये हात  पुन्हा एकदा. तू म्हणशील तेव्हा सुरांमध्ये सूर जुळवू स्वर पुन्हा एकदा. तू म्हणशील तेव्हा उभा तूझ्या पाठी घेवू गाठीभेटी  पुन्हा एकदा. तू म्हणशील तेव्हा चालू सोबतीने लढू सोबतीने पुन्हा एकदा. तू म्हणशील तेव्हा येईन धावून सावली होवून  पुन्हा एकदा. तू म्हणशील तेव्हा होवू एकजीव भरुया उणीव पुन्हा एकदा. तू म्हणशील तेव्हा मी तूपण सरावे, आपुलकीने जुळावे पुन्हा एकदा. --- अभय बापट

राधाकृष्ण -- राधा

कृष्णा,          कोणतरी आपलं आहे, आपल्यासाठी आहे, नेहमीचा सहवास,संपर्क नसला तरी दुर राहूनही कोणीतरी आपलं आहे ही भावनाच किती गोड आहे.दुधावरच्या सायी सारखी स्निग्ध,मुलायम.           कधीतरी अचानक ही जाणीव तुटते, तोडली जाते,नष्ट होते तेव्हा जाणवणारी वेदना कोणाला सांगावी.            कृष्णा तुलासुद्धा काहीजणांना दूर सारावे लागले,कर्तव्य कर्म म्हणून. तू तर सर्वज्ञ ना रे, तुझ्याही लक्षात आली नाही का वेदना, टाळले जाण्याची, तुटण्याची, एकाकीपणाची, आपलं म्हटलेलं दूर जाण्याची, हातातून हात सुटण्याची.            महाराणी द्रौपदीनी तुला बोलून तरी दाखवली, कृष्णा वस्त्रहरण तू थांबवू शकत होतास पण तू उशीर करुन तिची लाज तेवढी राखलीस कृष्णा.             आणि कृष्णा ज्यांच्यावर तीला अतुट विश्वास होता असे तिचे महापराक्रमी पती हतबलपणे मान खाली घालून बसले तेव्हाची तीचा वेदना ?               आणि माता कुंती अरे आत्याच ना रे तुझी, तीला ही तू द्य...

आठवणीची क्षणचित्रे

त्या जून्या वाटेवरुनी फिरुनी साद आली, आठवांच्या सुगंधाने  पायवाट मोहरीली. तेच शब्द, तेच श्वास मनात गर्दी झाली, आपुलकीची ऊब  मनावर पांघरली. रेंगाळत्या क्षणांची झाडे पुन्हा मोहरली बालपणींच्या सोबत्यांची आठवण जागवली. वाटेवरच्या वळणावर थांबून वेळ बोलली अरे इथेच तर तुझी आयुष्याशी भेट झाली. त्या जून्या वाटेवरती ओळख नव्याशी झाली पहाटवेळच्या किरणांनी कर्तृत्वाला जाग आली. नव्या जून्या क्षणांची भेट इथेच झाली त्या जून्या वाटेवरुनी ओळख नव्याने झाली. ----अभय बापट

राधाकृष्ण २

राधे,          एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, सावलीही आपली सोबत सोडायला लागली, नजरेला धुसर दिसायला लागले की समजावे,थांबायची वेळ झाली आहे, मग तो प्रवास कोणताही असू दे. अशावेळी उगाच सुर्याच्या शोधात ऊर फुटेस्तोवर धावणे नक्कीच शहाणपणाचे नाही.          काळोख दाटतो तो तुम्हाला एक पुर्ण नवा दिवस देण्यासाठीच.          अशा वेळी आपल्या आजूबाजूला असलेला निरांजनाच्या स्निग्ध उजेडला आपलेसे करावे, त्या शांत उजेडात शांत मनाने विचार करताना आपला मार्ग विचारपुर्वक निवडता येतो, जाणीवपूर्वक चुका टाळत मार्गक्रमण करता येते.            राधे,प्रेम ही एक सुंदर अनुभूती आहेच पण तो एक दिर्घ प्रवासही आहे. त्याच्या कणाकणावर आणि क्षणाक्षणावर अद्भुत सौंदर्याचा सडा पडलेला असतो,तो प्रवास पूर्ण करणाऱ्यांना नात्याचे वरदान लाभते पण प्रेमाला लक्ष्य ठरवणाऱ्यांच्या नशिबात येतो तो निव्वळ व्यवहार,अंतापर्यंत जावूनही अंतहीन.                राधे, प्रेमात व्यवहार असतोच, कारण प्रेमाला...

ऋतू गान

चैत्र वैशाख हसती, वसंत फुलवी बाग, उंच गुढीच्या दर्शनाने येई नववर्षाला जाग. ज्येष्ठ आषाढ तापती, ग्रीष्म होईल प्रखर, वटसावित्री व्रतात माया विश्वासावर भर. श्रावण भादवा येती, वर्षा ऋतू घेई धाव, नागपंचमी, कृष्णजन्म, मनात भक्तीचा भाव. आश्विन कार्तिक शोभती शरदाच्या शुभ्र चांदण्यात, नवरात्र, दीपावलीचे आनंद उत्साहात स्वागत. मार्गशीर्ष पौष थंडीशी हेमंताचा होत संयोग, संक्रांतीच्या गोडव्यात गीता शिकवी ज्ञानयोग. माघ फाल्गुन रंगती, शिशिर खेळतो रंग, शिवरात्र, होळीसंग ऋतू स्वतः मध्ये दंग. ---- अभय बापट

त्रिसूत्री

नव्या वाटेवर यावा विज्ञानाचा प्रकाश  अध्यात्माला साथ विवेकाची. नव्याने सुरवात आनंदाचा विचार माणसांचा आधर वाटेवर. समाधानाचा घेवू हातामध्ये हात समृद्धीची आस सर्वांच्या. संवादाचा सेतू शब्द संवादू उंच भरारी जाणीवांची. कर्तृत्वाला मिळे संवेदनांची जोड श्रमातून स्वप्न साकारावे ज्ञान, करुणा धैर्य त्रिसूत्री जीवनाची मानवतेचा दीप उजळवा. -----अभय बापट