माझ्या कवितेचे वेड
माझ्या उरी राहू दे,
माझ्या शब्दांचे कोड
माझे मला सुटू दे.
माझ्या गीताचा अर्थ
कोणातरी उमगू दे,
त्याच्या मुखातून ते
स्वर होवून उमटू दे.
माझ्या आर्ततेला नवे
कोंदण लाभू दे
कोणीतरी व्यथांचेही
थोडा हिशेब मांडू दे.
माझ्या काव्याची सुमने
कोणा पायी पडू दे
उचलून त्याने त्यांना
उराउरी भेटू दे.
माझ्या कविता अभंग
तुझ्या डोही राहू दे
नाही देवत्वाचा स्पर्श
तरी वचनी उरु दे.
माझ्या कवितेला गोडी
अमृतासम लाभू दे,
देवा तुझ्या कौतुकात
माझे कवित्व संपू दे.
Comments
Post a Comment