काकू, तिळगुळ घ्या गोड बोला.
मला माहितीय मेल्या, भयंकरणीकडे आधी गेला असशील नंतर माझी मेलीची आठवण काढली असशील.
आज्जीच्या परवानगीशिवाय मी कधी काही करतो का काकू ?
तिळगुळ पण तिच्या सल्ल्यानेच केला असशील?
हो तर,गुळ चिरायला पण आधी तिचाच सल्ला घेतला .
तुला पाडायला म्हणायचं आहे का?.
जिवंत रहायचयं काकू मला पुढच्या संक्रांतीपर्यंत.
माझ्या मनात असलेल्या छोट्या छोट्या तिळांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी गोड शब्दांचा गुळ घालायचा प्रयत्न केलाय काकू,आपले गोड शब्दसुद्धा काहीजणांना तिरकस टोमणे वाटतात🥲.
आधी बोलत जावं ! बाबा,समोरच्याला गुड, कडू वाटेल हे त्यांच्या त्या त्या वेळच्या मनस्थितीवर अवलंबून असते आणि हो, आपण सिग्धपणे माणसं जोडत गोडवा जपायचे काम करत रहायचे, आपल्या हातात तर तेवढेच असते.
नमस्कार करतो काकू.
बरं वाटलं रे बोलून, नाहीतर "२०० मेसेज पाठवण्यापेक्षा दोन गोड शब्द बोलून बघा" हे ही मेसेजमध्येच सांगायचे दिवस आलेयत हो.
दोन गोड शब्द
कानावर यावे,
दोन गोड क्षण
मनात उरावे
तोच हा दिन सुगीचा
मकर संक्रामणाचा
मनातून मनामध्ये
रुजत जावयाचा.
माझ्या कणाकणाने जोडलेल्या सर्व आप्तांना,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment