पावसाच्या पावलांंनी
तू अंगणात यावे,
पुन्हा एकदा वाटते
शब्दात भिजून चिंब व्हावे.
वाऱ्याची झुळुक होवून
तू घरामध्ये शिरावे,
तुझ्या सुगंधाने
घराचे देवघर व्हावे.
थंडगार वारा बनून
तू ग्रीष्माला लोभवावे,
माझ्या मनाला सोबत घेवून
तू दूर देशी जावे.
कोवळे ऊन बनून
तू माझ्या देहाला लपेटावे
सोनेरी तुझ्या किरणांसोबत
मी सोनेरी पहाट व्हावे.
निसर्गाचे रुप बनून
माझ्या गावातच रमावे
माझ्या गावानेच मग
Comments
Post a Comment