फुललो मी नेहमीच जेथे
निर्माल्य होवून गेलो
देवा तुझ्या डोईवरचा भार
मातीमध्ये मिसळून गेलो.
सुगंधाची लयलूट केली
देव्हाराही सजवून गेलो,
तुझ्या पासून तुटताना
भुईला सुगंध वाटून गेलो.
विझणाऱ्या वातीसारखा
हवेमध्ये विरुन गेलो,
देह सार्थकी होता होता
तुझ्या नावे उरुन गेलो.
फुलांचही माणसा सारखे
आयुष्य कोणासाठी संपते,
दोन दिसांनी नवीन फुलते
जूने माती होवून जाते
Comments
Post a Comment