शब्दांचा खेळ असतो
आयुष्याचा मेळ असतो,
कविता म्हणजे तरी काय
भावनांचा कल्लोळ असतो.
स्वप्नांचे प्रगट होणे
आठवणींचे दाखले देणे,
कविता म्हणजे तरी काय
विचारांचे व्यक्त होणे.
नात्यांचा मान असणे
जगण्याचे भान असणे,
कविता म्हणजे तरी काय
जीवनाचे गाणे गाणे.
सौख्याचे वाटणे असते
आनंदाचे वेचणे असते,
कविता म्हणजे तरी काय
एकमेकांशी जोडणे असते.
Comments
Post a Comment