अशीच होती कविता लिहीली
अशीच होती शब्द वेंधळी,
अशीच होती तुही समोरी
अशीच होती वेळ हळवी.
अशीच होती पहाटवेळ
अशीच होती थंडी गुलाबी
अशीच होती उब तनूवर
अशीच होती लाज लाजरी.
अशीच होती मान फिरवली
अशीच होती गोबऱ्या गाली
अशीच होता स्पर्श आर्जवी
अशीच होती फुले उमलली.
असेच होते मौन आपले
असेच होते हरवून जाणे
असेच होते अंतरावर
असेच होते तुझे नी माझे
असेच होते तुटत जाणे
असेच होते अबोल बघणे
असेच होते शोधत राहणे
असेच होते जगत जाणे.
Comments
Post a Comment